सेलूत गुणवंत शिक्षकांचा सत्कार
सेलू / प्रतिनिधी – राज्यस्तरीय पुरस्कार व विद्यावाचस्पती प्राप्त केलेल्या गुणवंत शिक्षकांचा नूतन विद्यालयातील कै. रा. ब. गिल्डा सभागृहात सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रशालेतील क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार आणि डॉ. सुरेश हिवाळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्दल यांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मनोगतात प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले की, ‘ विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांच्या रूपाने सुजाण नागरिक घडला पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवितात. गुणवंत शिक्षक सुसंस्कारित विद्यार्थी घडवितात.’
यावेळी सुधीर जोशी, आरती कदम, सूर्यकला सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, दत्ता घोगरे, मुख्याध्यापक सुखानंद बेडसुरे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, माजी विद्यार्थी केंद्र प्रमुख डॉ. शरद ठाकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी राजेंद्र सोनवणे, अतुल पाटील, अनंतकुमार विश्वंभर, संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे, रामेश्वर पवार यांनी भक्ती गीते, जुन्या चित्रपटातील गाणी गाऊन श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले तर डॉ. सुरेश हिवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.