श्री शिवाजी विधी महाविद्यालयात दीक्षांत पदवीदान समारंभ संपन्न
परभणी / प्रतिनिधी – श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथे शनिवार ८ फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वा दीक्षांत पदवीदान समारंभ घेण्यात आला.
व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय पी. माकणीकर, प्रमुख अतिथी म्हणून मा. न्या.उज्वला मनोहर नंदेश्वर, जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी. व मा.न्या. अर्चना मंगेश तामने, न्यायधीश, सचिव, जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, परभणी. तर प्रा. डॉ. राजेश बी. देशमुख हे परीक्षा विभाग प्रमुख म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी असलेल्या मा.न्या.उज्वला नंदेश्वर यांनी आपल्या भाषणातून कायदाचा मानवी जन्मापूर्वी पासून ते मृत्यू पर्यंत येत असलेला संबंध आणि कायदे विषयक असलेल्या संधी याबद्दल उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी एलएल. बी., बी.ए.एलएल.बी, एलएल.एम, डिटीएल. अभ्यासक्रमाच्या ६८ विद्यार्थ्यांना मा. न्या.उज्वला नंदेश्वर,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी यांच्या हस्ते पदव्यांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश बी.देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.डी. जवंजाळ तर आभार प्रा.डॉ. हर्षा सूर्यवंशी यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित नोंदवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. श्री चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री मकदुम मोहिउद्दिन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दिपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे व मा. श्री. संतोष इंगळे आदींनी अभिनंदन केले.