सेलूत ९ एप्रिल पासून कापूस खरेदी बंद

0 82

सेलू,दि 07 ः कापूस खरेदीदारांनी कापूस खरेदीसाठी असमर्थता दाखवल्याने सेलूतील कापूस खरेदी ९ एप्रिल पासून बंद होणार आहे .व तसे पत्र खरेदीदारांनी मुख्य प्रशासक , बाजार समिती ,सेलू यांना लेखी पत्र देऊन कळवले आहे .
कापसाची आवक कमी झाल्यामुळे ३१ मार्च रोजीच खरेदी बंद करण्याचा निर्णय कापूस खरेदीदारांनी घेतला होता .परंतु बाजार समितीचे ,मुख्य प्रशासक रंजीत गजमल व शेतकऱ्यांनी कापूस खरेदी चालू ठेवण्याची विनंती केली होती .परंतु त्यानंतर देखील आवक कमी असल्यामुळे व त्यामध्ये लेबर व हमाल टिकत नसल्याने कारखाना चालवणे अवघड जात आहे .”त्यामुळे ९/४/२२ पासून कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय खरेदीदारांनी घेतला आहे .व तसे पत्र देखील त्यानी मुख्य प्रशासक, बाजार समिती सेलू याना दिले आहे .या पत्रावर समर्थ ऐग्रो इंडस्ट्रीज ,बिहानी बिनायके कोटेक्स ,प्रल्हाद फायबर , मंजित कॉटन , मधुसूदन जिनिग ,स्वस्तिक कॉटन आदी खरेदीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत .सेलू परिसरात अजूनही कापूस शिल्लक असून शेतकरी बांधव भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असल्याने आवक थोडी कमी झाली आहे .

error: Content is protected !!