कंधार ग्रामीण रुग्णालयात वर्षा अखेरीस कोविड लसीकरणाचे काम, नांदेड जिल्ह्यात अग्रेसर
कंधार, उमर शेख – कंधार ग्रामीण रुग्णालयात डिसेंबर अखेरीस कोविड लसीकरणाचे काम नांदेड जिल्ह्यात अग्रेसर आहे .
जिल्ह्याकडून दिलेलं टार्गेट एकूण:-23274 एवढे होते.
तसेच कंधार येथील लोकसंख्या एकूण:-31023 एवढी आहे वरील नमूद लोक संख्येनुसार पहिल्या डोसचे काम जवळजवळ *91% च्या वर काम झालं आहे.
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.आर. लोणीकर सर व डॉ महेश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार शहरातील वॉर्ड निहाय लसीकरणाचे काम दिवस रात्रीच्या सत्रात जोरात चालू आहे.
तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यातील अधिकारी व कर्मचारी आणि इतर अधिकारी कर्मचारी हे मेहनत घेत आहेत .ग्रामीण रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉ. महेश पोकले सर यांचे मार्गदर्शन व नियोजन खूप मोलाचे आहे.कोविड लसीकरणाचे काम अतिशय सुंदर प्रकारे करण्याचे काम येथील संपूर्ण स्टाफ यांनी केले आहे.
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर.लोणीकर सर यांच्या कौसल्य पूर्ण नियोजन बध्द आखणीनुसार कंधार ग्रामीण रुग्णालयाचे नाव नांदेड जिल्ह्यात अग्रस्थानी आहे .
कंधार ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण पहिला डोस जवळपास एकूण :-21000 एकवीस हजार ,तर दुसरा डोस:-14000चौदा हजार आहे दोन्ही डोसचे एकूण काम:-34000 असून जवळपास 146%टक्केवारी लोकसंख्येनुसार झाले आहे
तसेच ओमीक्रोन व तिसरी येणारी लाट यांना घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाची येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेला पळवून लावण्याची तयारी लसीकरणामुळे झाली आहे व ओमीक्रोन ची नवीन व्यरियंटला पळून लावण्यासाठी लसीकरणाची गरज आहे. कंधार ग्रामीण रुग्णालयात जवळपास लसीकरण पूर्ण झाले आहे लसीकरणासाठी कंधार ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ व इतर कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले आहे. ओमीक्रोन व कोविड आजाराचे बऱ्याच ठिकाणी अनेक जिल्ह्यात रुग्ण आढळुन येत आहेत तरी कंधार येथील नागरिकांनी काही घाबरण्याच कारण नाही. लसीकरणामुळे कोरोना किंवा ओमीक्रोन झाला तरी ते सौम्य प्रकारचा असेल लसीकरणामुळे रुग्ण दगावन्याची शक्यता नाही .ओमीक्रोन सारख्या नवीन व्हेरियंटलाला पळवून लावण्यासाठी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दि:-03 जानेवारी 2021 पासून 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करून घेण्यासाठी भारतातील नागरिकांना संबोधित केले आहे.
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.आर लोणीकर सर यांनी लसीकरणासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे
तसेच वाढत्या ओमीक्रोन व्हेरीयटला लक्षात घेऊन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि Front Line Worker यांना दि:-10जानेवारी2021 रोजी कोविड लसीकरणाचा तिसरा (बुस्टर डोस) देण्याचे ठरवले आहे तसेच 60 वर्षे वयोगटातील नागरिकांना BP, शुगर असणाऱ्या नागरिकांना कोविड लसीकरणाचा तिसरा मात्रा देण्याचे ठरवले आहे .
तरी कंधार वासीयांना घाबरण्याचे कारण नसून कसलीही भीती न बाळगता आपले आयुष्य सुखरूप राहण्यासाठी लसीकरण करून घ्यावे.
या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ. विपीन इटनकर साहेब यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक
डॉ. एस.आर.लोणीकर सर यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण लसीकरणामुळे कंधार वासीयांसाठी सुरक्षा कवच तयार झाले आहे.त्यामुळे कंधार वासीयांनी कुठलीही भीती व दहशत बाळगू नये.तसेच वैद्यकीय अधीक्षक
डॉ. एस.आर.लोणीकर सर,डॉ पोकळे व त्यांच्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्याच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले आहे.यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील अधिकारी डॉ श्रीकांत मोरे, डॉ. अरुणकुमार राठोड ,डॉ. गजानन पवार, डॉ. शाहीन मॅडम, डॉ. नम्रता ढोणे मॅडम, डॉ. उजमा मॅडम व कर्मचारी श्री. दिलीप कांबळे श्री.शंकर चिवडे, श्री.लक्ष्मन घोरपडे,श्री.प्रशांत कुमठेकर, श्रीमती.प्रियंका गलांडे, श्रीमती.सुनीता वाघमारे,श्रीमती.सुरेखा मैलारे, श्री.विष्णुकुमार केंद्रे श्री.आशिष भोळे,श्री . यशवंत पदरे श्री.अरविंद वाठोरे,श्री. राजेंद्र वाघमारे, श्री. प्रदीप पांचाळ,पदरे यशवंत, श्रीमती.पार्वती वाघमारे, श्रीमती.आश्विनी जाभाडे, श्रीमती. मनीषा वाघमारे,श्रीमती.ज्योती तेलंगे , ज्ञानेश्वरी गुट्टे,निमिशा कांबळे,चंचल गवाले ,सरवर शेख,यांचे खूप मोलाचे योगदान मिळाले आहे .
त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.येत्या दि:-03 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या लसीकरणासाठी 15 वर्षे ते 18 वर्षे वयोगटातील संपूर्ण लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन वेळेनुसार व आदेशानुसार लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर.लोणीकर सर यांनी कंधार येथिल जनतेला केले आहे.