सेलूत माकपचे धरणे आंदोलन
सेलू ( नारायण पाटील)
सेलू ते डिग्रस जहागिर व डिग्रस जहागिर ते गोगलगाव पाटी रोडचे कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत या मागणीसाठी तसेच लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयक रद्द करावे.खरीप हंगाम २०२४ मध्ये पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३८०० हजार रुपये विमा भरपाई द्यावी. वीज ग्राहकांच्या संमती शिवाय स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबवावे ई. मागण्या करण्यात आल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांना देण्यात आले यावेळी सेलू ते डिग्रस व डिग्रस ते गोगलगाव पाटी रस्त्या बाबत संबंधित अधिकारी उपस्थित होते वरील दोन्ही रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण केले जातील असे लेखी पत्रे दिली डिग्रस गावच्या जनतेची एकजूट व माकपच्या ध्येय वादी नेतृत्वामुळे दोन्ही रोडचा प्रश्न मार्गी लागला.
आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौळ रामकृष्ण शेरे पाटील, उद्धव पौळ, सुहास पंडीत रामप्रसाद पौळ , राहुल डंबाळे, डिगांबर पौळ, धोंडीराम पातळे गणपत गोंडगे रंगनाथ ताठे नारायण पवार किशन पौळ संतोष पौळ वैजनाथ पौळ सुभाष शहाणे सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते —–