न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
सेलू / नारायण पाटील – येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित, न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले.
जि. प चे मा सभापती तथा शालेय समिती अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अशोकराव काकडे, यांच्या हस्ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शालेय समिती सदस्य श्री संतोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.प्राचार्य धनंजय भागवत यांनी केले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. त्यात एकच राजा इथे जन्माला,ऐसा देश है मेरा,गान वाजू दया,लेजा लेजा, मला जाऊ द्या ना घरी,गुलाबी शरारा, ढोलकी च्या तालावर, अशा अनेक गाण्यावर ठेका धरला. म्यूजिकल ड्रामा,एक पात्री नाटके आदि विद्यार्थ्यांंनी सादर केले.शेला पागोटे (फिश पाॅन्ड) ‘आनंद नगरी’ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरे शेषराव, कदम रामेश्वर , एम.आर.कुरेशी , प्रा.भाऊसाहेब निकम, प्रा. संतोष कुलकर्णी , प्रा. आबासाहेब सावंत, मैनू बेग, सोळंके दत्तात्रय, पवार एस.एन,पवार ए.बी. रोंटेवाड एस आर, मोरे डी.एस.गिरी जे जी , आव्हाड सर, सुनिल मोरे,जोगदंड मॅडम, तेलगोटे प्रनयना,मंजुशा बोराडे, विष्णू सरकटे , शिंदे सि यु, अजिंक्य बोराडे , अभिजीत कदम, गजमल,मोरे, काष्टी आदी कर्मचा-यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तोटेवाड जी के यांनी केले.
तर कार्यक्रमाचे आभार श्री गाडेकर सर यांनी मांडले. कार्यक्रमास विद्यार्थी,पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.