“दिवाळी पहाट “ठरली रसिकांच्या हृदयातील “मर्मबंधातील ठेव”

0 148

 

सेलू / नारायण पाटील – कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारी स्वरांगण प्रस्तुत “दिवाळी पहाट ” ही रसिकांच्या हृदयातील अक्षरशः “मर्मबंधातील ठेव “बनली .

 

कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या “दिवाळी पहाट ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब मंदिर मध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात केशवराज बाबासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली .यावेळी प्रसिद्ध उद्योजक रामप्रसाद घोडके ,शिक्षणाधिकारी विठ्ठलराव भुसारे व कार्यक्रमाचे आयोजक अशोकराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती .

या कार्यक्रमाची सुरुवात सच्चीदानंद डाखोरे व पूजा तोडकर यांनी गायिलेल्या घनश्याम सुंदरा या भूपाळीने करण्यात आली .सच्चीदानंद डाखोरे यांनी सूर निरागस होवो ,माझे माहेर पंढरी ,दिल्या घेतल्या वचनांची ,मन उधाण वाऱ्याचे ,अंदाज आरशाचा वाटे खरा व ऐसी लागी लगन ही गीते सादर केली .तर पूजा तोडकर हिने एरणीच्या देवा ,माळ्याच्या मळ्यामंदी ,मेंदीच्या पानावर ,रुपेरी वाळूत ,आली माझ्या घरी दिवाळी ही गीते सादर केली .मधूप्रिया कांबळे हिने सत्यम शिवम सुंदरम ,फुलले रे क्षण माझे गीते गायिली .लक्ष्मीकांत दिग्रसकर यांनी या जन्मावर या जगण्यावर हे गीत सादर केले .तर सच्चीदानंद डाखोरे व मधूप्रिया यांनी राजा ललकारी अशी दे हे गीत सादर केले तर शेवटी मधूप्रिया व पूजा तोडकर यांनी हम कथा सुनाते राम सकल हे गीत सादर करून रसिकांची अक्षरशः मने जिंकली .

यावेळी राष्ट्रवादीच्या युवती नेत्या प्रेक्षाताई भांबळे ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच रसिक महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती .
यावेळी संगीत साथ मध्ये गिरीष दिक्षित यांनी ढोलक साथ ,कार्तिक हिंगणे यांनी तबला साथ ,नईम शेख यांनी की बोर्ड साथ ,श्रीनिवास लंकावाड यांनी बासरी साथ ,प्रणव जोग यांनी गिटार साथ तर संदीप पुंडगे यांनी ऑक्टोपॅड वर साथ दिली .
महेश अचिंतलवार यांनी अत्यंत सुरेख शैलीत कार्यक्रमाचे निवेदक म्हणून जबाबदारी सांभाळली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले .

error: Content is protected !!