पीक विम्याची नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी
सेलू / प्रतिनिधी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेलु शिवसेनेच्यावतीने आज पिकविमा भरणा केलेल्या सेलु तालुक्यातील सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठीचे निवेदन उपजिल्हाधिकारी सेलु व तालुका कृषी अधिकारी सेलु यांना देण्यात आले .
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सेलु कृ.उ.बाजार समितिचे मा.सभापती श्री रंजित गजमल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख शहरप्रमुख मनिष कदम,तालुकाप्रमुख रमेशराव डख,उपतालुकाप्रमुख गोविंदराव सोळंके,सुधाकर पवार,वारकरी संप्रदायचे ता.प्रमुख विठ्ठल महाराज कारके,सोशलमिडीयाचे गुलाबराव खेडेकर,मा.संचालक अरुण ताठे,जिवन चव्हाण,दत्तराव झोल,राजेश झोल,बाबा भाबट,उपशहरप्रमुख नवनाथ खांडेकर,पांडुरंग गजमल,अमोल डासाळकर,अमोल इंगोले,रमेश शेळके,व सर्व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .