कंत्राटदार कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कानउघडणी

2 221

शब्दराज मिडिया
परभणी,दि 26 ः
एकतर कंत्राटदारी करा किंवा पूर्णवेळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करा दोन्ही भूमिका करणार असाल तर चालणार नाही,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बनवेगिरी,चमकेगिरी  करणाऱ्या आणि कंत्राटदार कार्यकर्त्यांना स्थान नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांनी चमकू आणि  कंत्राटदार कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

परभणी येथील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोेहळा पार पडला.यावेळी  माजी मंंत्री नवाब मलिक, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी आमदार सुरेश जेथलिया, सुरेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा म्हणाले,हल्ली कंत्राटदार कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे,तोच कंत्राटदार, तोच पुढारी.. असलं  आपल्या पक्षात हे जमणार नाही, मी बारामतीत देखील कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीने सूचना दिल्या आहेत.एक तर कंत्राटदार व्हा नाहीतर कार्यकर्ता, हाच नियम परभणीत देखील लागू आहे, परभणीच्या विकास कामासाठी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असला आणि तो जर विकास कामात बनविगिरी करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात कंत्राटदार कार्यकर्त्यांची कानउघडनी केली.
पक्षात निर्व्यसनी आणि स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते असले पाहिजेत,काहीही बरळु नका,चांगल्या मार्गाने जनतेची सेवा करा असे देखील पवार म्हणाले.
पीक कर्ज वेळेवर भरा अन्यथा व्याज भरा
शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज दिले जाते शून्य टक्के दराने हे कर्ज वाटप असून वेळेत भरले तर कोणतेही व्याज लागत नाही परंतु न भरल्यास व्याजासकट भरावे लागेल असे अजित दादा यांनी सांगितले.

error: Content is protected !!