अंगणवाडी तील बालकांना मेनू प्रमाणेच पोषण आहार वाटप करा – माणिक पंडित
आ, बाळापूर (आनंद बलखंडे) शहरात एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत एकूण १४ अंगणवाडी कार्यरत आहेत या मधून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना निकोप , सुदृढ , शारीरिक व मानसिक वाढीसाठी पोषण आहार शासनाने ठरवलेल्या मेनू प्रमाणे वाटप करावे असे निर्देश आहेत , बचतगट पोषण आहार वाटप करत असतात परंतु गटा मार्फत हा पुरवठा नियमितपणे व दर्जेदार होत नसल्याचे दिसून येते आहे .या बाबतीत वंचित आघाडीच्या पदाधिकारी यांनी काही अंगणवाड्या ना भेट देऊन या पोषण आहाराची पाहणी केली असता , मेनू प्रमाणे आहार न देता केवळ खिचडी दिल्या जात असून पोषण आहारातील ठरलेला मेनू दिसून आला नाही , मेनू मध्ये वरणभात, मुरमुरा लाडू , तुरडाळ, मसुरडाळ ,मुगडाळ, गूळ शेंगदाणे चिक्की,राजगिरा , मटकी उसळ , गव्हाची लापशी ,हिरवा वाटाणा , याचा समावेश आहे परंतु सदरील बचत गटाकडून याचा पोषण आहारात कुठेच वापर होत नसल्याचे दिसून आले आहे . या बाबतीची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकारी कळमनुरी याना निवेदन देऊन बचत गटा वर कार्यवाही करावी व पूर्वी प्रमाणे अंगणवाडी सेविका यांना बालकांचा खाऊ शिजवण्या ची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे . निवेदना वर ता .सचिव माणिकदादा पंडित , उपाध्यक्ष यशवंत नरवाडे , सुभाष खाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत . या निवेदना मुळे बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर मात्र आला आहे .