सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थिनींना गणवेश वाटप
सेलू, प्रतिनिधी – श्री के बा विद्यालयाचे माजी विद्यार्थी व नूतन विद्यालयातील उत्कृष्ट कला शिक्षक श्री किशोर कटारे यांनी आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त के बा विद्यालयातील होतकरू विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप केले.
माजी विद्यार्थ्याने शाळेप्रति आपली अस्मिता जपण्याचा आदर्श हा प्रत्येक माजी विद्यार्थ्याने घेतला पाहिजे तसेच ज्या शाळेने आपल्याला घडवले,जिथे आपले बालपण फुलले त्या शाळेला सर्वतोपरी सहकार्यही केले पाहिजे असे मत यावेळी कटारे सरांनी व्यक्त केले.
के .बा .विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात किशोर कटारे सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सविता कटारे ,शाळेचे मुख्याध्यापक पी एस कौसडीकर ,सहशिक्षक नरेश पाटील तसेच विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते.
शाळेच्या वतीने देखील यावेळी किशोर कटारे यांचे हार्दिक आभार मानण्यात आले .