सेलूत शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा,श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू ( नारायण पाटील )
येथील श्रीराम प्रतिष्ठान ने परभणी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली असून ” शिक्षणा मध्ये अभिप्रेत असलेले आवश्यक बदल ” हा या निबंध स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला आहे .या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम परितोषक १००१/- रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय परितोषक ७०१/- रुपये रोख ,स्मृतीचन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय परितोषक ५०१/- स्मृतीचन्ह व प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत .तसेच प्रथम पांच स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
तसेच प्रतिष्ठान च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार नॉमिनेशन घेतले जाणार असून या नॉमिनेशन मधून ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” “उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ” तसेच ” नाविन्यपूर्ण शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .शाल ,श्रीफळ ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे .
यासाठी शिक्षकांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा अहवाल २ सप्टेंबर पर्यंत पाठवणे अपेक्षित आहे .
निबंध स्पर्धेसाठी मराठी ,हिंदी व इंग्रजी विषयासाठी ५०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून निबंधावर शिक्षकाचे नावं, शाळेचे नावं व मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे . असे निबंध ३ सप्टेंबर पर्यंत पाठवायचे असून ४ सप्टेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे .
५ सप्टेंबर या शिक्षक दिनी प्रिन्स इंग्लिश सी बी एस इ स्कुल विद्याविहार संकुल रवळगाव रोड येथे दुपारी २ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे .
तरी परभणी जिल्ह्यातील सरकारी व खाजगी शाळेतील जास्तीत जास्त शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा .असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ .संजय रोडगे यांनी केले आहे .
अधिक माहिती साठी
आकात सर ( ८८०५४८३४७४ )
खरावणे मॅडम
(८०८७५७३९९७)
हिबारे मॅडम
( ८१८००५५६६३)
यांचेही संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे .