जिल्हास्तरीय शालेय (ग्रामीण) योगासन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न; ऐंशी खेळाडूंचा सहभाग
सेलू, प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद परभणी व जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी नूतन विद्यालय सेलू येथे जिल्हास्तरीय शालेय ग्रामीण गटाच्या योगासन क्रीडा स्पर्धा यशस्वी संपन्न झाल्या.
सदरील योगासन स्पर्धा मुला मुलींच्या तीन वयोगटात 14/17/19 वर्षाआतील ट्रॅडिशनल ,आर्टिस्टिक आणि रिदमिक या तीन प्रकारात घेण्यात आल्या. या स्पर्धेत परभणी, जिंतूर, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ ,पूर्णा ,सेलू ,या तालुक्यातील एकूण ८० मुला मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे , पर्यवेक्षक किरण देशपांडे,टेनिक्वाईट जिल्हा सचिव कृष्णा कवडी, जिल्हा शा.शि.शि. कार्याध्यक्ष तुकाराम शेळके, पर्यवेक्षक नागेश कान्हेकर, राज्य चिटणीस टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे , जिल्हा योगासन असोसिएशन सचिव देविदास सोन्नेकर, नारायण शिंदे, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी तथा राष्ट्रीय खेळाडू प्रकाश एकबोटे यांनी योगाभ्यासाच्या साधने संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व म्हणाले सर्व क्रीडा प्रकारांचे ज्ञान खेळाडूंनी ठेवले पाहिजे. सध्या चालू असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी राज्य तसेच राष्ट्रीय योग पटूंचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, कृष्णा कवडी आणि देविदास सोन्नेकर पंच म्हणून माधव देशपांडे शिल्पा पिंपळे सोमनाथ महाजन ,प्राची माणकेश्वर ,पूर्वा माणकेश्वर, कृष्णा होलीया ,शुभांगी काकडे, कल्याणी रामपूरकर, आर बी पदमपल्ले , वरकड यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कान्हेकर यांनी प्रास्ताविक गणेश माळवे यांनी स्पर्धे संदर्भात देविदास सोन्नेकर यांनी माहिती दिली.