अफवांवर विश्वास ठेवू नका,बाजारपेठ पुर्ववत सुरु,जिल्हाधिकारी यांची माहीती
परभणी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची अवमान झाल्याचा प्रकार घडला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंद दरम्यान हिंसक वळण लागले, यामध्ये व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सध्या सर्वत्र शांतता आहे, परभणीत या घटनेच्या अनुषंगाने विविध नेते, पदाधिकारी भेटी देत आहेत असे असताना शुक्रवारी अचानक सायंकाळी काही अफवा पसरल्या गेल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली, बाजारपेठ पटापट बंद झाली. एसटी महामंडळाने देखील आपल्या बसेस थांबवून घेतल्या. काही वेळात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. नागेश लखमवार यांनी तातडीने खुलासा करत कोणतीही घटना घडली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करत नागरिकांना बाजारपेठ सुरू ठेवण्यास सांगितले, पोलिसांनी देखील शहरात फिरून बाजारपेठ सुरू ठेवा असे आवाहन केले, खासदार संजय जाधव यांनी देखील बाजारपेठेत फिरत व्यापाऱ्यांना बाजारपेठ उघडण्यास सांगितले त्यामुळे सायंकाळी उशिरा सर्व वातावरण पुन्हा शांत झाले.