काळजी करू नका, मी सोबत आहे – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे
प्रतिनिधी:
गंगाखेड तालुक्यातील मौजे राणीसावरगाव येथील श्री स्वप्नील कटकमवार यांच्या गिरी बालाजी या किराणा दुकानात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती. यावेळी दुकानाचे फार मोठे नुकसान झाले. गंगाखेडचे संवेदनशील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना यांना ही बातमी कळल्यानंतर आ. गुट्टे यांनी नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी करुन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत त्या अनुषंगाने प्रशासनाला तसे निर्देश ही दिले होते. त्यामुळे प्रशासन कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
दुकानाचे नुकसान फारच मोठे आहे हे मला माहीत आहे. परंतु बुडणाऱ्याला काडीचा आधार या नुसार मी माझ्या वतीने मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्तास आज १ लक्ष रुपयांचा धनादेश देऊन त्यांचे दुःख वाटून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला असल्याचे आ.गुट्टे यांनी मौजे मुळपेठ तांडा आणि मौजे राणीसावरगाव येथील धनगरवस्तीत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मा.जि.प. सदस्य मोहनराव गळाकाटू, मार्केट कमिटीचे संचालक माऊली जाधव, मा.सरपंच अल्ताफ शेख, प्रभारी हनुमंत मुंडे, युवक तालुकाध्यक्ष बालाजी लटपटे, उपसरपंच गफार शेख, मा. सरपंच परसराम गुट्टे, दलीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल बानाटे,माजी सरपंच सोमनाथ कुदमुळे, भरत नागरगोजे, उपसरपंच धारखा हाके, ग्रा.प.सदस्य आकाश राठोड, व्यापारी अघाडीचे डी.एन भिमनपल्लेवार, भास्कर ठवरे, गोविंद डोणे यांच्यासह गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.