सुक्ष्म निरीक्षणाची सवय लावा- डॉ. रामेश्वर नाईक
सेलू / प्रतिनिधी – येथे दि. २६ एप्रिल रोजी कै.सौ. मेघा अनिरुद्ध पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी व नूतन विद्यालय सेलू च्या सहकार्याने ” अवकाशाचे अंतरंग व ग्रहता-यांशी मैत्री” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे अध्यक्ष व प्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक यांनी अवकाश, ग्रह ता-यांची व नक्षत्रांची माहीती दिली. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व श्रोत्यांना सुक्ष्म निरीक्षण करण्याचा सल्ला दिला व त्यांचे फायदे सांगितले व्यासपीठावर डॉ. सुबोध माकोडे, श्री संतोष पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास
परभणी ऑस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे डॉ. पी आर पाटील , श्री सुधीर सोनूनकर, श्री प्रसाद वाघमारे , श्री अशोक लाड, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ विजयकिरण नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना टेलीस्कोप च्या साह्याने ग्रह ता-यांचे दर्शन व माहिती दिली.
या कार्यक्रमास प्रा. डॉ . कोठेकर, जयप्रकाश बियाणी, दत्तराव पावडे, प्रा. राठोड व इतर मान्यवरांची उपस्थिती होती तसेच सेलू शहरातील प्रतिष्ठित नागरीक व महिलां व विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचलन कु. वैष्णवी पिंपळगावकर ने केले तर आभार प्रा. डॉ. अमित कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. संजय पिंपळगावकर, प्रा. श्रीकांत देशमुख, किरण देशपांडे, रामपुरकर, प्रा. ढेकळे, राजेंद्र रोडगे , प्रविण लोया, श्रीनिवास पिंपळगावकर , मंदार पाटील, शिवाजी सोळंके व अनिरुद्ध पिंपळगावकर यांनी प्रयत्न केले.