डॉ.संजय रोडगे मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित
सेलू,दि 21 (प्रतिनिधी)
नाशिक येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येणाऱ्या मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार एल . के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला यांनी केले. तसेच प्रॉस्परस पब्लीक स्कूल येथे प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर, शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.
डॉ. संजय रोडगे आपल्या मनोगतामध्ये सांगत होते की, तालुका सारख्या छोट्याशा गावामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची शाळा निर्माण केली. मुलांचे भवितव्य चांगले घडवण्यासाठी शाळेत रोबोटिक लॅब इंग्लिश लॅब राजीव गांधी विज्ञान प्रयोगशाळा
उपलब्ध करून दिले. तसेच मुलांनी या सर्व सोयींचा वापर करून भविष्यात मोठी पदवी मिळवावी अशी अपेक्षा मुलाबद्दल व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कल्पना भाबट व सारिका ताठे यांनी केले.