दिव्यांगांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती-बालकल्याण संस्थेचा उपक्रम

0 2

पुणे,दि 26 (प्रतिनिधी):
आय टी सी लिमिटेड कंपनीच्या मिशन “सुनेहरा कल” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील 200 विशेष सक्षम व्यक्तींसाठी उद्योजकता आणि कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतून दिव्यांग (विशेष सक्षम) व्यक्तींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या २५ विद्यार्थ्यांच्या तुकडीने नुकतेच हे प्रशिक्षण पूर्ण केले. या २५ विद्यार्थांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम काल मंगळवार दि. २४ रोजी बालकल्याण संस्था येथे पार पडला. या कार्यक्रमा मध्ये २३ विद्यार्थांना नोकऱ्यांचे नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती संगीता डावखर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून आय टी सी लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. निशांत कुमार उपस्थित होते. तसेच आयटीसी लिमिटेड चे मुनेश सक्सेना, सायली कदम, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी चे ग्रुप डायरेक्टर विक्रम सराफ, सहायक व्यवस्थापक वैभव निमगिरे, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापक सौ. अपर्णा पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण हे तीन मंहिने कालावधीचे डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर या अभ्यासक्रमाचे होते तर पात्रताधारक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे नि:शुल्क दिले गेले. यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणा बरोबर उद्योजकता विकास आणि रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन सहभागी प्रशिक्षणार्थीना दिले गेले.
या वेळी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी उपस्थित विद्यार्थांना मिळालेल्या संधीचे सोने करून नोकरी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन करीत या उपक्रमाचे कौतुक केले. आय टी सी लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. निशांत कुमार यांनी आयटीसी लिमिटेड कंपनी यापुढे ही दिव्यांगांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवीत राहील याची ग्वाही देत नियुक्ती पत्र मिळालेल्या विद्यार्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बालकल्याण संस्थेच्या संचालिका सौ. अपर्णा पानसे यांनी संस्थेबद्दल माहिती देत विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले. सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे ग्रुप डायरेक्टर श्री. विक्रम सराफ यांनी दिव्यांग विद्यार्थांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे अशी आशा व्यक्त केली.
सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे चे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला. या उपक्रमासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क च्या प्रकल्प संचालिका सोनाली भट्टाचार्जी, प्रकल्प समन्वयक श्री. मनोज कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

 

error: Content is protected !!