पांडुरंगाच्या नामस्मरणाने परम सुखाची प्राप्ती होते-हभप चैतन्य महाराज देगलूरकर
रामभाऊ आवारे
निफाड,दि 08ः
भाविक,भक्त,साधकाने श्रद्धा युक्त अंतकरणाने श्री विठ्ठलाचे नामसमरण केले तर त्यास भवरोग व त्रिविध ताप नाहीसे होऊन परम सुखाची प्राप्ती होते असे प्रतिपादन ख्यातनाम कीर्तनकार हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.कसबेसुकेने ता,निफाड येथील राज्य वारकरी महामंडळ सुकेने शाखा कार्याध्यक्ष हभप गौरव महाराज सांडखोरे यांचे वडील भजनी मंडल सदस्य व निष्ठावंत वारकरी हभप खंडेराव सांडखोरे यांनी केलेल्या पायी नर्मदा परिक्रमा परिपूर्ती निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञान यज्ञ यानिमित्त आयोजित कीर्तनातून केले.आपल्या प्रासादिक व रसाळ वाणीने अनेक दृष्टांत ,दाखले देऊन श्री देगलूरकर महाराजानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.ख्यातनाम गायक हभप भारत महाराज रासने,राम महाराज पैठणकर, गणेश महाराज, समाधान महाराज रिंगणगावकर, विकास महाराज पाटील,चेतन महाराज नागरे, बाजीराव महाराज नले,अक्षय महाराज रणशिंगे, लक्ष्मण महाराज पडोळ यांच्यासह जिल्ह्यातील गायक, भजनी मंडळींनी गायन साथ केली, एकनाथ महाराज कोष्टी,कृष्णा महाराज बैरागी, अथर्व पडोळ आदींनी मृदंनग साथ केली, यावेळी बाळासाहेब महाराज संगमनेरे, नंदकिशोर महाराज झोमन, निलेश महाराज पवार, रजनीताई सोनवणे, पुजाताई वाघ, निफाड तालुका वारकरी महामंडळ अध्यक्ष भाऊसाहेब भवर,कार्यवाह अंबादास दिघे, दत्तू काका गडाख, भागवत कथा प्रवक्ते माधवदास राठी, कलंत्री, पांडुरंग आहेर यांच्यासह मालेगाव, दिंडोरी, ओझर, सिन्नर, सिद्धपिंप्री, जानोरी, मोहाडी, हातनोरे, आंबे, नांदूर मध्यमेश्वर, खेडले झुंगे, म्हाळसाकोरे, चांदोरी, वडाळी नजीक व जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,किर्तनानंतर हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे खंडेराव सांडखोरे व सांडखोरे परिवाराच्या वतीने पुरोहित महामंडलेश्वर अजित शास्त्री पिंपळे यांच्या वैदिक मन्त्र घोषात गुरुपूजन करण्यात आले, यावेळी माधवदास महाराज राठी, सुहासराव भंडारे, राजेंद्र भंडारे, सांडखोरे परिवार व नाते वाईक,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.