शरद पवारांच्या गुगलीवर फडणवीसांची विकेट; नेमकं असं काय घडलं?

0 212

मुंबई – २०१९ साली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यात झालेल्या शपथविधीवरून पुन्हा राजकारण तापलं आहे. २०१९ साली सत्तासंघर्षाच्या घडामोडी सुरु असताना मी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट गेली, असं विधान राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्या एका गुगलीने एकतरी सत्य बाहेर आलं,” (One of my googles revealed one truth) असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

 

पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मागील 24 तासात पुन्हा गाजायला लागला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी पहाटे शपथ घेतली होती, त्यावरून सुरू झालेलं राजकारण नॉन स्टॉप सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली, असं वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यानंतर खुद्द शरद पवारांनीच गुगली टाकली. ‘भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जावू शकतो, हे दाखवून द्यायचं होतं’ (They wanted to show that BJP can go to any level for power) अशी गुगली टाकून शरद पवारांनी (sharad pawar) पहाटेच्या शपथविधीची विकेटच घेतली.

 

 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“मला खूप आनंद आहे की, कमीतकमी नेमकं खरं काय होतं ते मी शरद पवार यांच्या तोंडावर मी आणू शकलो. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे. उरलेलं सत्य देखील मी फार लवकर घेऊन येईन. मी सुद्धा गुगली फेकणार आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने हे सत्य तर बाहेर आणलंच. आता उरलेलं सत्यदेखील बाहेर येईलच. मी हळूहळू त्यांच्याकडूनच ते सत्य बोलून दाखवेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस यांना बाहेर पाठिंबा देण्याची भूमिका ही ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होती त्यावेळेला जाहीर केली होती. तो त्या काळचा प्रश्न आहे. यानंतरच्या काळात जे त्यांनी सांगितलं की, ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली ही गोष्टही खरीय”, असं शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

 

“त्यांनी स्वत: सांगितलंय की, यासंबंधीचं धोरण मी दोन दिवसांनी बदललं. मी दोन दिवसांत धोरण बदललं तर सोबत यायचं काय कारण होतं? त्यानंतरच्या दोन दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? शपथ घ्यायची होती तर ती अशी चोरुन पहाटे का घेतली?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.

 

 

“आमचा त्यांना पाठींबा होता तर ते सरकार दोन दिवसांत राहिलं का? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजासमोर यायला हवेत या दृष्टीने काही गोष्टी केल्या होत्या”, असा स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

 

 

“देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेसाठी काय करु शकतात, कुठे जाऊ शकतात, हे सगळं समजण्याची ही स्थिती आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

“हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे”, असं शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.

error: Content is protected !!