शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी-ना.एकनाथजी शिंदे
सेलू, प्रतिनिधी – शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच सेंद्रिय शेतीची कास धरावी व शेती सोबत पूरक उद्योग सुरू करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते मा ना एकनाथजी शिंदे यांनी तालुक्यातील खवणे पिंपरी तेथील भूमिपूजन सोहळ्यात केले .
तालुक्यातील खवणे पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या विमेवा ऊस प्रक्रिया उदोगाचे भूमिपूजन दि २० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .यावेळी उदघाटक म्हणून मा ना एकनाथजी शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे खासदार संजय जाधव व महाड- पोलादपूर चे आमदार भरतसेठ गोगावले यांची उपस्थिती होती .
यावेळी यासपीठावर आ राहुल पाटील, मा ज्ञानेश्वर कनोजे,शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, युवासेनेचे दिपक बारहाते ,शिवाजीराव शेवाळे,श्रीरंग जाधव ,उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार,सहायकपोलीस अधीक्षक अबिनाश कुमार ,जी प सदस्य राम खराबे,अनिलराव नखाते आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना एकनाथजी शिंदे पुढे म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र येथून येऊन तुषार जाधव व ज्ञानेश्वर कनोजे यांनी हा उस प्रक्रिया उदयोग सुरू करीत आहेत तरी या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विकास करून घ्यावा व विकेल ते पिकेल या धोरणानुसार शेती करावी असे आवाहन केले .या परिसरातील शेती सुपीक असून पाण्याची देखील चांगली उपलब्धी आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी शेत पिकावरील प्रक्रिया उदोगकडे वळावे असे आवाहन आ भरतसेठ गोगावले यांनी मनोगतात केले .खासदार संजय जाधव,आ राहुल पाटील यांनी देखील यावेळी मनोगतात या ऊस प्रक्रिया प्रकल्पाला शुभेच्छा देऊन कौतुक केले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तुषार जाधव यांनी या ऊस प्रक्रिया उभारणी मागील उद्देश स्पष्ट करून या परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत गलबे यांनी केले तर देवळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले