अखेर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0 83

सेलू / नारायण पाटील – गेल्या कित्येक वर्षांपासून अपक्ष निवडणूक लढवीत नगर परिषदेवर सत्ता स्थापन करणारे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला आहे .गेल्या कित्येक दिवसापासून बोराडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सेलूत होतीच .अनेक वृत्तपत्रातून बातम्या देखील आल्या होत्या .व बोराडे यांनी देखील याबाबत दुजोरा दिला होता

 

अखेर आज दि ७ फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार ,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाबाजांनी दुर्राणी याच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला आहे .

 

त्यांच्या सोबतच माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,साईराज बोराडे ,मा.नगर सेवक मारोती चव्हाण, रमेश दौड,सचीन कोरडे, सतीश जाधव ,गौतम धापसे,वहिद अन्सारी ,बालु झमकडे, शेख कासीम,शेख आयुबभाई,बबन गायकवाड,शेख अन्वर, व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र झोडगावकर,बालासाहेब सरकाळे, शेख रौप ,नासर पठाण यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे .

 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या सह सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत न जाता शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता .त्यामुळे अजितदादा पवार यांचे बळ सेलू तालुक्यात कमी दिसून येत होते .परंतु विनोद बोराडे यांच्या प्रवेशामुळे त्यांना निश्चितच बळ मिळणार आहे .परंतु राजकारणात कधी काय होईल हे भाकीत कोणीच करू शकत नाही .त्यामुळे बोराडे यांना या प्रवेशाचा काय फायदा होईल हे सद्यस्थितीत तरी काहींच सांगता येत नाही .परंतु विनोद बोराडे देखील गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात असल्याने त्यांनी देखील हा महत्वाचा निर्णय योग्य विचार करूनच घेतला असेल .हे मात्र नक्की

error: Content is protected !!