अर्थ व नगरविकास खाते कोणाला..आली महत्वाची माहीत..खाते वाटप..
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज किंवा उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रीही आपल्याला कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आपल्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेने गृहखात्यासाठी बराच आटापिटा केला. पण त्यांच्या पदरी निराशा आली. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडचं अर्थ खातं फडणवीस स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजितदादांकडे अर्थ खातं राहणार की नाही असं बोललं जात होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खातं अजितदादांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एकनाथ शिंदे हे गृह आणि नगरविकास खात्यासाठी आग्रही होते. पण गृहखाते त्यांना देण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतर आता नगरविकास खातं आणि भाजपकडे असणारे गृहनिर्माण खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. यापैकी नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशी माहितीही आहे.
त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंत्रिमंडळात होती ती महत्त्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत. तर शिंदेंना हवं असलेले गृहखातं हे भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहखातं आपल्याकडेच ठेवणार असल्याची माहिती आहे. तर नगरविकास खातं हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.
भाजप-
- गृह
- महसूल
- सार्वजनिक बांधकाम
- पर्यटन
- ऊर्जा
शिवसेना-- नगरविकास खातं
- गृहनिर्माण
———
राष्ट्रवादी-
- अर्थ
- महिला आणि बालविकास
- उत्पादन शुल्क
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादीला जाणार असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं हे शिवसेनेला देण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जाणार असून ते अजितदादा स्वतःकडे ठेवणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादीकडेच राहणार असून आदिती तटकरे या त्या खात्याच्या मंत्री असणार आहेत अशी माहिती आहे.
राष्ट्रवादीत मकरंद पाटील यांना सहकार खातं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा स्वत:कडे अर्थ आणि नियोजन खातं ठेवणार आहेत. तर आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी, तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद दिलं जाणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय राष्ट्रवादीला राज्य उत्पादन शुल्कही दिलं जाणार आहे. अजित पवार हे खातं स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.