श्री माधवाश्रम विद्या मंदिर येथील माजी विद्यार्थी आले तब्बल २२ वर्षांनी एकत्र
सोनपेठ/ प्रतिनिधी
तब्बल २२ वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रीत आलेल्या सोनपेठ तालुक्यातील श्री माधवाश्रम विद्या मंदिर येथील सन २००१- २००२ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रविवार दिनांक १९ मे रोजी उत्साहात संपन्न झाले.
तब्बल २२ वर्षांनी एकत्रित आलेल्या मित्र-मैत्रीणीच्या आनंदाला यावेळी उधाण आले होते.
उपस्थित शिक्षकांचे सन्मानजनक आगमन करुन सुरवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर उपस्थित सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील मुख्याध्यापक रमाकांत बुरांडे हे होते तर प्रमुख उपस्थितीत निवृत्त मुख्याध्यापक दौलतराव चाटे, मुख्याध्यापक सुनील आदोडे,कर्वे, गोविंद दौंड,रमेश कांबळे, विष्णूकांत आदोडे,रेवडकर,हनिफ खान यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील आदोडे व दौलतराव चाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुंजा जयतपाळ तर आभार अनिल सुर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सन २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.
चांगले संस्कार पुढच्या पिढीला देणं गरजेचं – सुनील आदोडे
आयुष्यात नियोजनाला अत्यंत महत्व असुन उज्वल भविष्यासाठी चांगले नियोजन केलेच पाहिजे.
आपण जे शिकलो आहोत आणि आपल्यावर जे चांगले संस्कार झाले आहेत त्यामुळे आपल्यातील इश्वरी तत्व विकसीत होऊन सर्वसामावेशक अशा सर्वांगीण विकासासाठी आणि पुठची पीढी तितकीच संस्कारित होण्यासाठी चांगले संस्कार पुढच्या पिढीला देणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मुख्याध्यापक सुनील आदोडे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.