साडे चार हजार लाडक्या बहिणींची माघार,मंत्री आदिती तटकरेंनी सांगीतली पुढची भुमीका
लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांना आपले अर्ज माघारी घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे. या योजनेत आता हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांचे पैसे परत घेतले जाणार का?
या योजनेत पैसे परत घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे का परत घेत नाही, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेत जर महिलांनी पैसे परत केले तर ते सरकारी तिजोरीत जमा केले जातील. हे पैसे इतर लोककल्याणकारी योजनांसाठी वापरले जातील.
लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेत त्यांचं काय होणार?
याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, आतापर्यंत साडेचार महिलांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत. याव्यतिरिक्त महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. त्यातूनही अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी लाडक्या बहिणींना सांगते की, जर तुम्हाला पात्र लाभापेक्षा जास्त रक्कम आली असेल किंवा तुम्ही अपात्र असाल तर पुढाकार घेऊन अर्ज माघारी घ्यावेत. त्यामुळे पडताळणी आणि लाडक्या बहिणींनी माघारी घेतलेल्या अर्जांची आकडेवारी पुढे-मागे होऊ शकते.