सेलूत मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबीर
सेलू( प्रतिनिधी )
येथील लायन्स क्लबच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजाता येथील हुतात्मा स्मारकमध्ये मोफत नेत्र, मोतिबिंदू शस्त्रक्रीया व दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी , सचिव डॉ. बाळासाहेब जाधव यांनी दिली.
शिबीरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक असल्यास लायन्स आय हॉस्पीटल मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व योग्य सल्ला – मार्गदर्शन केले जाणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. नेत्र व दंत तपासणी साठी तज्ञ डॉक्टरांची टीम सेलू येथे येणार आहे. तसेच उच्च दर्जाच्या सुविधा असलेल्या लायन्स हॉस्पीटल मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या मोफत नेत्र व दंत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष अजित सराफ, सहसचिव डॉ. अनुराग जोगदंड , कोषाध्यक्ष डॉ.शैलेश मालाणी , डॉ. उमेश गायकवाड , डॉ.कैलास आवटे,डॉ. कुंदन राऊत, डॉ. परेश बिनायके , दत्तात्रय सोळंके, डॉ. सुदर्शन मालाणी , कुशल तांगडे , अनुप गुप्ता , राजेंद्र सराफ , सागर लोया , बिराजदार आदी परिश्रम घेत आहेत.