मतदार संघातील प्रत्येक गावात रस्ते व नाली बांधकामासाठी निधी उपलब्ध करणार-आमदार डॉ.राहुल पाटील

0 78

परभणी,दि 06 (प्रतिनिधी)ः
परभणी मतदार संघात विकासकामे करताना आधीच्या टप्यात शहराला जोडणारे पक्या रस्त्यांची निर्मिती केली.आता प्रत्येक गावात सिमेंट काँक्रीटचे अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम करुन प्रत्येक गावांचे सुशोभीकरण करण्यात येईल.यासाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आमदार डॉ.राहुल पाटील यानी सांगितले.
परभणी विधानसभा मतदार संघातील मटकराळा येथे जिल्हा परिषदेच्या तीस लक्ष रु.निधी अंतर्गत संपूर्ण गावात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी करण्यात आले.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे , पंचायत समिती सदस्य रणजीत गरुड, सरपंच शिवाजीराव गरुड, अरविंदकाका देशमुख , उपसरपंच भागवत गरुड,प्रल्हाद देवडे, शाहुराव गरुड,सोपानराव गरुड , सुभाष गरुड, माउली गरुड,गोपाळ गरुड,शाखाप्रमुख श्रीराम गरुड ,नारायण लिझडे ,बळीराम राउत आणि गावकरी मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!