रस्ताच्या निकृष्ट कामाचा गांधीगिरीने निषेध

0 44

सेलू / नारायण पाटील – येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ व संथ गतीने होत असून रस्ता दुभाजकात झाडे लावण्यासाठी दगडयुक्त मातीचा सर्रास होत आहे .तसेच गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत .व याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ आज रस्ता दुभाजकात बेशरम ची झाडे लावून व रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन केले .

 

यावेळी जयसिंग शेळके ,अक्षय सोळंके ,रवी मोगल ,नरेश पांचाळ ,गणेश काचेवार ,कैलास बोराडे ,पांडुरंग सावंत ,सतीश आकात ,शिवम गटकळ ,हाके सर ,पप्पू कदम,लक्ष्मण बोराडे ,प्रद्युम्न शेळके ,विकी राठोड ,विश्वभर दीक्षित ,परवेज सय्यद ,इरफान बागवान आदींची उपस्थिती होती .

error: Content is protected !!