विवेकानंद विद्यालयात भूगोल दिन साजरा

0 9

 

सेलू / प्रतिनिधी – शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात भूगोल दिन साजरा करण्यात आला. भूगोलतज्ञ सी.डी.देशमुख यांचा जन्म दिवस १४जानेवारी आहे त्यानिमित्ताने राष्ट्रीय भूगोल दिन साजरा होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर शितोळे ,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिवानंद हाके तसेच अनिल कौसडीकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 

प्रा.शिवानंद हाके यांनी मानवी जीवनात भूगोलाचे अनन्यसाधारण महत्व आहे हे स्पष्ट केले.भूगोलाचा इतिहास सांगितला. अवकाश ,ग्रहण ,ग्रीनीच वेळ याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भूगोल शिक्षक गजानन साळवे यांनी केले.सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!