गरीब व वयोवृद्धांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या आ.डॉ.गुट्टे,पालम येथील महाराजस्व अभियानात अनेकांना लाभ

0 18

प्रतिनिधी
पालम तालुक्यातील गरीब कष्टकरी ,निराधार व वयोवृद्धांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध योजना असून त्या योजना गोरगरिबापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळमळीने काम करावे असे आवाहन पालम येथे आयोजित केलेल्या महाराजस्वअभियानाच्या कार्यक्रमात बोलताना आ.रत्नाकरराव गुट्टे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना आ.गुट्टे म्हणाले की आजही ग्रामीण व शहरी भागात गरीब कष्टकरी व वयोवृद्ध उपाशीपोटी जीवन जगत असून त्या उपाशीपोटी कुटुंबाला मदत करण्यासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत पालम चे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सर्व योजना गोरगरिबापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांची प्रशंसा करून असे अधिकारी जर प्रत्येक तालुक्याला लाभले तर गोरगरिबांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगुन म्हणाले की गरिबाला मिळणाऱ्या लाभांमध्ये काही दलाल त्यांच्याकडून चिरीमिरी घेत असल्याच्या माझ्याकडे तक्रारी येत आहेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दलाला मार्फत पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी होत अशा दलापासुन सावध रहावेअशे आवाहन आ.गुट्टे यांनी केले
. अनेक शासकीय सेवा व योजनांचे लाभ सुलभ पध्दतीने लाभार्थी वर्गापर्यंत पोहोचवणे, हा महाराजस्व अभियानाचा उद्देश आहे. आजचा काळ विज्ञानाचा आणि प्रगतीचा आधुनिक म्हणून आपण मानत असलो तरी अनेकांचे विचार मात्र, बदललेले दिसून येत नाहीत. तरीही आज स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात नावलौकिक करून आपण राजमाता जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी आहोत, हे दाखवून दिले आहे.महाराजस्व अभियान कार्यक्रमात आ.गुट्टे यांच्या हस्ते एक हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर बोलताना म्हणाले की
समाजातील विविध घटकांचे जीवनमान उंचावावे आणि त्यांना साहाय्य व्हावे, यासाठी शासन वेळोवेळी अनेक योजना राबवित असते. पण, ते लाभ पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यात अनेकदा वेळ जातो. प्रवास खर्च होतो. परिणामी, नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला असून या माध्यमातून सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले
यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे,रहीमतुला पठाण, गणेशराव घोरपडे बाबासाहेब एंगडे,भगवान सिरस्कर, नायब तहसीलदार पवळे,घनसावंत मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी महिला, पुरूष, युवक-युवती, पदधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्यने उपस्थित होते.

error: Content is protected !!