गोदावरी घाट स्वच्छता व आरती अभियान
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गंगाखेड व गोदावरी स्वच्छता अभियान यांचा संयुक्त उपक्रम
गंगाखेड – आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विकासार्थ विद्यार्थी(SFD)गतीविधी व गोदावरी स्वच्छाता अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर निर्माण व श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त गोदावरी घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गोदावरी घाटा वरील सर्व स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित अभियान प्रमुख ॲड.राजु देशमुख,ॲड.स्मिता देशमुख,जिल्हा संयोजक अजय टोले, शहर मंत्री अर्जुन चव्हाण, सहमंञी सुचिता नरवाडे,जिल्हा सहसंयोजक राजेश फडणीस, तालुका संयोजक संदीप पवार , ऋषिकेश गिराम, भरत गव्हाणे, अनंता निरस,गोविंद पुरी, माणिकराव मुंडे,प्रतिभाताई वाघमारे, औताडे मॅडम, चिंतामणी देवळे, दिपक जोशी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.