गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची संत गोविंदबाबा दादूपंथी मठ गोशाळेत भेट
सेलू,दि 29 ः
राज्यमंत्री व महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी येथील संत गोविंदबाबा दादूपंथी मठ गोशाळेत भेट दिली. शासनाच्या वतीने गोशाळेस 20 लक्ष रुपये मंजूर करून दिले. गोशाळेच्या बऱ्याच अडचणी मा.मुंदडाजी यांना सांगण्यात आल्या त्यावर तोडगा काढण्याचा आश्वासन त्यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने शेखर मुंदडा यांचे स्वागत केले. कार्यक्रमास कोहिनूर उद्योग समूहाचे नंदकिशोर बाहेती, विजयकुमार बिहाणी , सुरेंद्र(भाऊ)तोष्णीवाल, संदीपभाई शर्मा महाराज, वल्लभ बाहेती, जगनराव पवार, ॲड संजय लोया,ॲड खोना, शिवनारायण मालाणी, राजेंद्र करवा, श्रीराम जन्मोत्सव समितीचे कृष्णा काटे उपस्थित होते.