पोखर्णी (नृ.) येथे श्री संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमीत्त अभिवादन
परभणी,दि 26 ः
पोखर्णी नृसिंह ता. जिल्हा परभणी येथे संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. गावातील भुजंगबुवा मठामध्ये भजन करण्यात आले. दुपारी 12 वाजता गुलालाची उधळण करून संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी गावातील भजनी मंडळ व महिला भावी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन गावातील पांडुरंग उंडाळकर व गजानन उंडाळकर तसेच कुंभार समाज बांधव तर्फे करण्यात आले होते.