श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन कक्ष सुरू
परभणी दि.10:
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी दिली आहे.
बारावी परीक्षा व राज्य सामायिक परीक्षेच्या निकालानंतर दरवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रम व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची घाई सुरू असते. यामुळे अभियांत्रिकी प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पद्धतीने शासनाकडून राबवली जाते यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती गरजेची असल्याने श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे माहिती कक्ष सुरू करण्यात आले आहे राज्य सामायिक परीक्षा कक्ष यांच्या वतीने प्रथम वर्ष अभियांत्रिकी व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करण्याची 18 नोव्हेंबर थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी 15 नोव्हेंबर 2021 ही अंतिम तारीख असल्याने विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, विकल्पाची निवड,विविध शाखा ,अभ्यासक्रमाची माहिती, विविध संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश घेतल्यानंतर शासनाचे मिळणारे आर्थिक लाभाच्या योजना, विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित केलेल्या प्रवेश याविषयी विविध शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्रास विद्यार्थी व पालकांनी भेट द्यावी. अधिक माहितीसाठी प्रा.बी.बी.कदम मो9975935161 ,प्रा.एस.पी.पाईकराव मो.9158522922 , यांच्याशी संपर्क साधावा.