एचएआरसी संस्थेने दिले निराधार ताईला उदरनिर्वाहाचे साधन
परभणी,दि 02 ः
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च & चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने आज दि 2 मार्च रोजी रंगनाथ काळदाते महाराज यांच्या जयंतीनिमित्त तारूगव्हाण ता पाथरी येथील अंजली घोळ या निराधार ताईस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व शेळीचे एक पिल्लू भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
पार्श्वभूमी: पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण येथील अंजली घोळ यांच्या पतीने अर्ध्यावर संसार सोडून दिला व आपल्या पत्नीस निराधार बनवले, त्या स्वतः निराधार असून अर्धांगवायू ने पीडित वृद्ध आई व वडील आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्या कुटुंबास स्वतःचे घर, स्वतःची शेती किंवा जमीन काहीही नसून शेतात मोलमजुरी करून कसे बसे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी धडपड करत आहे. तसेच दर महा आई वडिलांचा औषधोपचार त्या निराधार ताईस करावा लागतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारुगव्हाणचे शिक्षक देवनाळे नवनाथ यांनी कालच त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आणि फोनवर या कुटुंबाची कैफियत आमच्याकडे मांडली. त्या ताईस उदरनिर्वाहाचे साधन देण्याचे आवाहन केले.
एचएआरसी संस्थेने केलेल्या मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत सुनंदा ढाके ताई, हार्दिक ठाकर, राजकुमार भगत, अलोक जोशी, सचिन सरकले या दात्यांनी सहयोग दिला.
याप्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, ऍड चंद्रकांत राजुरे, अंगद माडे, मल्लिकार्जुन उस्तुरे सर व नवनाथ देवनाळे सर व गावातील नागरीक उपस्थित होते.