हातनूरचे नागेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान,महाशिवरात्रनिमित्त आजपासून यात्रेला सुरवात

0 2

सेलू (प्रतिनिधी )
तालुक्यातील हातनूर येथे यादव काळातील नागेश्वरांचे हेमाडपंथी मंदिर आहे. सातशे ते आठशे वर्षांची परंपरा लाभलेले नागेश्वर देवालय विख्यात आहे. नागेश्वर भाविकांचे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रनिमित्त बूधवार २६ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सेलूहून आवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या हातनूर (ता. सेलू) येथे नागेश्वरांचे मंदिर आहे. हेमाडपंथी असलेल्या या नागेश्वराच्या मंदिराला बाहेरून रंगरंगोटी केलेली आहे. मंदिर आवारात शिरताच पहिली नजर पूर्वेकडे असलेल्या बारवावर स्थिरावते. बारव पाच ते सहा चौरस टप्प्यांची असून तिला चारही बाजूंनी प्रवेशाची सोय आहे. मंदिराचा काळ व बारवेच्या बांधणीचा काळ एकच आसावा, असे बारवेच्या बांधणीवरून वाटते. पडझड झालेल्या बारवेची ग्रामस्थांनी दुरुस्ती केल्यामुळे बारव पुन्हा रेखीव व सुंदर झाली आहे. कला इतिहास आणि शिलालेख, बारव व मंदिराच्या आजूबाजूला काही उत्तर चालुक्यातील स्तंभांचे आजही तुकडे आढळतात. तसेच महिषासुरमर्दिणी, भैरव काही सिद्ध योगी यांच्या खंडित मूर्तीही आढळतात. मंदिरासमोरील चौथऱ्यावर गणपती, माहेश्वरीसदृश्य शक्ती देवता, गणेश खंडित नंदी, पादुका असे उत्तर चालुक्यकालीन पुरातन अवशेष मांडून ठेवलेले आहेत. आजचे मंदिर उत्तर चालुक्य काळातील मूळ अधिष्ठानावर उभे आहे. वैशिष्ट्य म्हणजे सभामंडप आणि गर्भगृह दोन्हीचे विधान तारकाकृती (चांदणी सारखे) आहे. त्यात सभामंडपाच्या अधिष्ठानाला तीन बाजूंनी पायऱ्या आहेत.

शिलालेखातून जीर्णोद्वाराची साक्ष
मूळ चालुक्य मंदिर त्रिगभों असावे. यादव काळातील संदर्भमुखमंडपातील स्तंभावरील शिलालेखातून स्पष्ट होतात.
शके १२२३ म्हणजेच १३०१ सालातील शिलालेख मूळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची साक्ष देतात. पुरुषदेव पंडित याने प्लवनाम संवत्सरात नागनाथ मंदिराची वृद्धी केली. अर्थात जीर्णोद्धार केला. हे हरिदेव नावाच्या शिल्पकाराकरवी करून घेतले. इथे शिल्पकाराला ‘सुतार’ असा शब्द वापरला आहे. यात उल्लेखला ‘पुरुषदेव’ हा पुरुषोत्तमपुरी ताम्रपटातील यादव सम्राट रामचंद्रदेव यांचा पंतप्रधान पुरुषदेव असावा. लेखाचा काळ व अक्षर वाटिका उत्तर यादवकालाशी सुसंगत आहे. यावरून मूळ मंदिर त्या आधीचे आहे. मंदिरात आत नागेश्वर मंदिरासमोरील बारव,आत शिरल्यावर सभामंडपाची उंची विशेष लक्ष वेधून घेते. नागशीर्षयुक्त उठावदार अर्धस्तंभ असलेला स्तंभविरहित आहे. सभामंडपाचे छत असामान्य आहे.
सात दिवस धार्मिक कार्यक्रम
दरवर्षी सात दिवस धार्मीक कार्यक्रमानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असे मात्र यावर्षी शिवमहापूराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.शूक्रवार २१ रोजी पासून या शिवमहापूराण कथेस प्रारंभ झाला असून सांगता गूरूवार २७ रोजी होणार आहे तसेच दूपारी गाड्या ओढणे,महाप्रसाद, सध्यांकाळी श्रीची पालखी मिरवणूक शूक्रवार २८ रोजी भव्य जंगी कूस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!