जिल्हा परिषदेत २७२ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
परभणी,दि 19 ः
रुवार दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची रोजची धावपळ व बदलती जीवनशैली या विचारातून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गीते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, डॉ. आर एम सोनवने यांच्या निरीक्षणात संपन्न झाले.
जिल्हा मुख्यालयातील कर्मचारी संख्या ३२७ एवढी असून यापैकी २७२ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांच्या पैकी ८६ जणांना बीपीचे निदान झाल्याने त्यांची ईसीजी करण्यात आली. जिल्हा परिषदे मधील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वजन, उंची, बीपी, शुगर, इसीजी, रक्ताची तपासणी, इ एन टी तज्ञाकडून तपासणी, स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी, जनरल वैद्यकीय तपासणी, निदान, आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला.आरोग्य विभागातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी जयश्री दीपक, कैलास सोमवंशी, डॉ. रेवती महाजन, कृष्णा साळवे, गवारे, गट प्रवर्तक व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.