जिनिंगमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान
अधिकाऱ्याकडून जिनिंग मालकाची पाठराखण
सेलू / प्रतिनिधी – सेलू परभणी रोडवर असलेल्या गट क्रमांक १९ मधील मे .मधुसूदन जिनिग अँड प्रेसिंग मधून होणाऱ्या प्रदूषणामुळे जिनिग शेजारी उत्तर बाजूस असलेल्या सर्व्हे नंबर १८/२ मधील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून जमिनीचा पोत देखील खराब होत असल्याची तक्रार शेतमालक गजानन बाबुराव शेरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,परभणी यांच्या कडे केली आहे .गेल्या ३ ते ४ वर्षापासून संबंधित शेतकरी हे आर्थिक नुकसान सहन करीत असून संबंधित अधिकारी मात्र कार्यवाहीसाठी दिरंगाई करीत आहेत .
या जिनिंग मधील प्रदुषणाचा त्रास गेल्या ३ ते ४ वर्षांपासून होत आहे .महागडी बियाणे ,खते व औषधी खरेदी करून शेतकरी मेहनत करतो .परंतु जिनिग मधील कापूस प्रक्रियेतील निघणारी कापसाची ( रज्जी ) शेतात गेल्यामुळे पिकांची वाढ खुंटते व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते . याबाबत संबंधित शेतकऱ्याने वारंवार जिनिग मालकाला तोंडी कल्पना दिली व वकिलामार्फत देखिल रीतसर नोटिसा पाठवल्या आहेत .परंतु कांहीच कार्यवाही होत नसल्यामुळे शेवटी नाविलाजास्तव शेतकऱ्याने ८/७/२४ रोजी याबाबची रीतसर तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,परभणी यांच्या कडे केली आहे . परंतु शेतकऱ्याच्या पदरी अजूनही निराशाच पडली आहे .महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ,परभणी यांनी या प्रकरणी जिनिग मालकाला १०/७/२४ रोजी वॉर्निंग नोटीस देखील दिली आहे . व जिनिग मालकाने उत्तरात भविष्यात कारखाण्याद्वारे प्रदूषण होणार नाही .यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील असे कळवले आहे .दरम्यान परभणी कार्यालयाने पुढील कार्यवाहिसाठीचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी ,छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे पाठवला असून त्यांच्या मार्फत उद्योगाला निर्देश देऊन आपला कारखाना का बंद करण्यात येऊ नये .याबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे .जिनिग मधून निघणाऱ्या कापसाच्या बारीक कणांमुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत अहवाल देण्याचे तालुका कृषी अधिकारी ,सेलू यांना कळवले आहे .
मात्र ही कार्यवाही म्हणजे केवळ कागदोपत्री घोडेच असून प्रत्यक्षात कांही होत नाही .व संबंधित जिनिंग मालक आपल्या ओळखीच्या जोरावर सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करीत आहे .व अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालीत आहेत . व तुझी जमीन मला विकत दे अशी भाषा जिनिंग मालकाकडून वापरली जात आहे .यामध्ये माझे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत .असल्याचे शेतकऱ्याने म्हणणे आहे .या प्रकरणी लवकरात लवकर योग्य न्याय मिळाला नाही तर आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे देखील शेतकरी बोलून दाखवत आहे .