जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी येथे भरले ऐतीहासिक नाण्यांचे प्रदर्शन

0 0

परभणी,दि 26 ः
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा कात टाकत असून नवनवीन प्रकारचे उपक्रम जिल्हा परिषद शाळेत राबवले जात आहेत.जिल्हा परिषद शाळा उमरी ही देखील जिल्ह्यात विविध प्रकारचे उपक्रम राबण्यासाठी ओळखली जाते. मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी ने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. उमरी येथील असलेले व 2005 साली जिल्हा परिषद परभणी येथून सेवा निवृत्त झालेले शिक्षक दत्तराव रामराव गोरे गुरुजी यांच्या सहकार्याने शाळेने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भौतिक बाबीची माहिती व्हावी या उद्देशाने ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरवले या माध्यमातून विविध प्रकारच्या नाण्यात निजामकालीन, इंग्रजकाळातील नाण्यांचा समावेश होता.त्यात एक आणा,अर्धा आणा,पाव आणा, त्याचप्रमाणे 1 पैसा,दोन पैसे,तीन पैसे,पाच पैसे,10,20,50 पैसे त्याचप्रमाणे हाली पैसा,चित्रकूट लिहिलेली नाण्यांचा समावेश होता.त्याचप्रमाणे दोन आणे,उर्दू भाषेत अक्षरे असलेली नाणी यांचा पण समावेश होता.अनेक नाण्यांवर त्या काळातील राज्यांची चित्रे कोरलेली होती. अत्यंत जुन्या काळातील नाणी ही हाताने ठोकलेली होती.शंभर व त्या वर्षाच्या अगोदरची नाणी सुद्धा पाहण्यात आली. काही नाण्यांवर राष्ट्रकूट असे लिहिलेली होते.राष्ट्रकूट लिहिलेल्या नाण्यांवर इंग्रज च्या राजासोबत मैत्रीचा उल्लेख पण नाण्यांवर आढळून आला.अनेक नाणी ही तांब्याची असलेली होती तर बरीच ही चांदी पासून बनवलेली होती.
भारताबरोबरच नेपाळ व अमेरिकेतील नाण्यांचा देखील संग्रह दत्तराव गुरुजी यांनी केला होता. नेपाळ व इतर ठिकाणी फिरताना त्यानी ही नाणी गोळा केली त्याचप्रमाणे लहानपणापासून चा असलेला छंद त्यांनी जोपासला.त्यांच्यामुळे शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी य प्रदर्शनाचा लाभ घेतला.यावेळी शाळेतील शिक्षक शरद लोहट, धुराजी मगरे,अनंत कुलकर्णी,रघुनाथ कराले, आरलकर अर्चना,ज्योती गांगुर्डे,प्रगती कराळे,तोरंबेकर एस व्ही,अशोक हंडगे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल गोरे,सदस्य गजानन गोरे,ज्ञानोबा गोरे,शाम गोरे,संजय गोरे,जगन्नाथ गोरे,मुंजाभाऊ गोरे, अरुणा कांबळे हे देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!