प्रणव सातभाई सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मानीत
निफाड,दि 27 ः
कल्याणी बहुउद्देशीय संस्थेचा २० व्या वर्धापन दिनानिमित्त नासिक येथे कवी कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडला. कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या विसाव्या वर्षातील सामाजिक योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून वनसगाव ता निफाड येथील डॉ चंद्रशेखर सातभाई यांचे चिरंजीव प्रणव सातभाई या २२ वर्षीय तरुणाने पोर्ट्रेट कलाक्षेत्रात एक हजाराहून अधिक पोर्टेट साकारल्या बद्दल विश्वविक्रमाला गवसणी घातली असून त्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण महासंघ अध्यक्ष पुणे आनंद दवे, ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ स्मिताताई कुलकर्णी, माननीय श्री दिलीप स्वामी भा प्र से प्रमुख कार्यकारी जि प सोलापूर, प्राध्यापक डॉ एस एस सोनवणे संस्थापक गरुड झेप, सौ सुनीता ताई धनगर शिक्षणाधिकारी नाशिक मनपा, सौ दिपाली चांडक संचालक स्वयं शक्ती, श्री पियुष बिरारी डायरेक्टर समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा, श्री यतीन वाघ माजी महापौर नाशिक मनपा, डॉ प्रशांत भुतडा आर्थोपेडिक सर्जन, श्री निवृत्ती गोदाजी संचालक युनिटी ऍग्रो, नाशिक मर्चंट बँक व्हाईस चेअरमन प्रकाश दायमा, ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष बाळासाहेब पाठक, तसेच ज्येष्ठ अभिनेत्री विद्या ताई करंजीकर, पूजा ताई खडसे निमिषा इंटेरियर, पुनम आचार्य फिटनेस कोच, माधुरी जोशी अवचट अभिनेत्री पुणे आदी उपस्थित होते.
कल्याणी संस्थेची वाटचाल तसेच विसाव्या वर्षातील सामाजिक योगदाना निमीत सामाजिक, राजकीय, क्रीडा, सिने, शैक्षणिक, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. कल्याणी संस्था गेल्या वीस वर्षापासून समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्यरत आहे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वंचित मुले, यांच्या शिक्षण, व्यवसाय व समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संस्था प्रयत्न करते. बचत गटातील महिलांना रोजगार देऊन संस्थेने त्यांना सक्षम व स्वावलंबी बनवले आहे.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक कल्याणी संस्था,अध्यक्ष सुनीताताई मोडक, अध्यक्ष खजिनदार कल्याणी मोडक कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी केतकी चौधरी, एस एन जी पॅकेजिंगचे नितीन बोर्डीकर सर होते.