सेलूत अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांचा कार्य गौरव
सेलू ( प्रतिनिधी )
येथील श्रीराम कंस्ट्रक्शन व स्टोन क्रशरच्या वतीने अभियंता दिन व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त १५ सप्टेंबर रविवार रोजी तालुक्यातील कुपटा येथे अभियंत्यांच्या आयोजित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षपदी बी एस कोलते होते. सां.बा.विभागाचे उपअभियंता बळीराम माने, इंजि. सतिश बलदवा,इंजि.दिपक कुपटेकर , इंजि.संग्राम सोनी, शामराव मते माजी बांधकाम सभापती, ज्ञानेश्वर राऊत संचालक कृषी उत्पन बाजार समिती, इंजी. पृथ्वीराज भांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अभियंता दिनानिमित्त श्रीराम कंस्ट्रक्शन च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सेलू-जिंतूर तालुक्यातील सर्व अभियंत्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पांडुरंग धामणगावकर,बालाजी उदावंत यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्यांनी अनुभव, कामाची गुणवत्ता व एकमेकांच्या सहकार्याने विकास करण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष इंजि सुशील नाईकवाडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर ज्ञानेश्वर मते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी आर.जे.पठाण,गंगाधर आडळकर , प्रशांत माणकेश्वर,प्रशांत सोन्नेकर,रवी मंत्री,गजानन आडळकर, भगवान कुमावत, शेख आर्शद, हादी अन्सारी, योगेश गजमल , शेख मुजमिल, अभिमन्यू घुगे, शेख अनिस, शेख रेहान , तेजस कडे, प्रशांत इंगोले, अब्दुल राफे, प्रध्मुन राठोड, राहुल सोलापूरे,युनुस शेख,असलम मोदी, शेख अझहर, शेख फरहान,अनुराज मालाणी, यासेर शेख,उदय दडके, पुरूषोत्तम शिदे मामा ,प्रमोद कुलकर्णी,विनीत मालानी,योगेश गजमल,मधुकरराव पौळ,भगवानराव जाधव,बालचंदानी,रोहन आकात,संदीप आडळकर, सिध्दू खोसे पाटील,शंभू काकडे,बाबाराव वायाळ आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम कंस्ट्रक्शनचे संचालक दत्तात्रय सोळंके, नितीन सोळंके, कैलास राऊत,ओमराजे मते, विठ्ठल झांजे, रामेश्वर शेवाळे, शिवाजी शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.