छत्रपती फाउंडेशनच्या वतीने खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते महिलांचा सन्मान

0 102

 

निफाड,दि 06 (प्रतिनिधी)ः
 छत्रपती फाउंडेशन च्या वतीने नाशिक येथे छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला आहे.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात छत्रपती फाउंडेशन आयोजित रणरागिनी गौरव सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज मराठा सकल समाजाचे बहुजनांच्या विकासाच्या ध्यास घेतलेले व श्री सन्मान व श्री विकास आग्रही असणारे मा खा युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे भोसले होते तर व्यासपीठावर खासदार राहुल ढिकले, छत्रपती फाउंडेशन ची संस्थापक अध्यक्ष गणेश कदम, छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष सुप्रिया गणेश कदम,निखेज पाटील आदी उपस्थित होते.

 मनमाड येथील पुरस्कार प्राप्त रणरागिनी व क्षेत्र
 सौ सुवर्णाताई निकम (सामाजिक कार्य), सौ सुरेखाताई धुमाळ (सामाजिक बांधिलकी),सौ रेखाताई येणारे ( जलदुत),प्रा सौ अन्नपूर्णा पाटील (शैक्षणिक कार्य),नारीशक्ती सन्मानासाठी संत चरित्र ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य संघटक सौ सवितामाई पगार, समाजसेविका सौ संगीता ताई पाटील, सौ सुनिताताई जगताप,सौ कविताताई पाटेकर,सौ संध्या गवळे,सौ संगिता मगर (पाटील), सौ नलावडे ताई, सौ सुवर्णा निकम, सौ रेखा येणारे, सौ सुरेखा धुमाळ आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

error: Content is protected !!