कै. बाबाराव रावसाहेब ढगे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
परभणी,दि 14 ः
महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कै. बाबाराव रावसाहेब ढगे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सोमवार (ता.१४) रोजी साजरी करण्यात आली. यावेळी बापूराव बरगे, प्रा. डॉ. जयंत बोबडे, मुंजाजी शेवाळे, राम पतंगे, केशव यादव, ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष ढगे आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दोन्हीही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ.जयंत बोबडे यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला.