मनुष्य जन्म दुर्लभ आहे, याचा अध्यात्मासाठी पुरेपूर उपयोग करा-श्रीमान देवानंद पंडित दास

0 76

 

सेलू / नारायण पाटील – चौऱ्यांशी लक्ष योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो व याचा अध्यात्मासाठी व भगवंत नामस्मरणासाठी पुरेपूर उपभोग घेऊन जीवन सार्थकी लावावे .असे आवाहन वृन्दावन येथील अध्यात्म गुरू श्रीमान देवानंद पंडित प्रभू जी यांनी सेलू येथील कार्यक्रमात केले .

 

येथील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये इस्कॉन च्या वतीने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत ,संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती ए सी भक्तवेदांत स्वामी श्री ल प्रभूपाद यांच्या हरिनाम संकीर्तन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी प्रवचनकार म्हणून श्रीमान देवानंद पंडित प्रभू हे होते .यावेळी प्रवचनात त्यांनी भागवत कथेतील विविध विषयाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले .

यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की ,आपल्याला मिळालेल्या अत्यन्त दुर्लभ अशा मनुष्य जन्माची साध्यता करून घ्यावयाची असेल तर अध्यात्म ज्ञान व भगवंत भक्तीची जोड असणे अत्यंत गरजेचे आहे .नसता याशिवाय जीवन जगणे म्हणजे एक प्रकारे “आत्महा “म्हणजेच आत्म्याची एक प्रकारे हत्याच आहे .माणसाने जर नियमितपणे जप साधना केली तर निश्चितच पाप करण्याची प्रवृती कमी होऊन अध्यात्म प्रगती होते .असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .

 

प्रवचन कार्यक्रमाच्या आधी व नंतर सुंदर असे नामसमरण करण्यात आले .यावेळी उपस्थित भाविक भक्त देखील या नामस्मरनात व प्रवचनात अत्यंत रमून गेले होते .दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात भक्तांची व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती .
संस्थानचे पुजारी नारायण पाटील यांच्या हस्ते श्रीमान देवानंद पंडित प्रभू यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक देविदास पाटील हे होते तर सह आयोजक कृष्णा कोत्तावर ,सुधाकर तायनाक,पांडुरंग नखाते ,रवी मोगल यांची प्रमूख उपस्थिती होती .

error: Content is protected !!