मी सत्तेबाहेर राहून काम करेन-एकनाथ शिंदे, पण… भरत गोगावलेंनी केला मोठा खुलासा

0 247

विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन १० दिवस होत आहेत. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अजूनही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे महायुतीत उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज मुंबईत महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते, परंतु आम्ही सर्वांनी आग्रह केला. तुम्ही सत्तेबाहेर राहून नव्हे तर सत्तेत राहून काम करायचा असं विधान शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.

 

आमदार भरत गोगावले म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारलं आहे. निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरणं आमच्या स्वभावात बसत नाही. ‘भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू’. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून होत असलेल्या चर्चेला व प्रश्नांना काहीच अर्थ उरत नाही.”

error: Content is protected !!