संभाजीराजेंनी अपक्ष लढावं हा तर फडणवीसांचा डाव, छत्रपती शाहूंचा खळबळजनक गौप्यस्फोट

0 177

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजीराजे छत्रपती  यांनी अखेर शुक्रवारी राजकीय लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. सगळं काही ठरलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असं म्हणत आपल्या माघारीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं. परंतु या प्रकरणातली सध्याची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड हाती आलीये. ‘संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही तर फडणवीसांची खेळी होती’, असा मोठा गौप्यस्फोट संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती ) यांनी केला आहे.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्यात राज्यसभा निवडणुकीबाबत प्लॅन ठरला होता. अगदी आमच्या दोघांमध्ये ड्राफ्टही ठरवला गेला. काही मुद्द्यांवर एकमत नसल्याने आम्ही सहमतीने एकमेकांना दोन दिवस विचार करण्यासाठी दिले. पण तोपर्यंत सेनेने वेगवेगळ्या बातम्या पेरल्या. पुढच्या २४ तासांत संजय पवार यांचं नावही जाहीर झालं. मुख्यमंत्र्यांनी माझा शब्द मोडला. उद्धवजी असं वागतील याची मला अपेक्षा नव्हती”, असा आरोप करत संभाजीराजेंनी आपण राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

संभाजीराजेंनी अपक्ष लढावं हा तर फडणवीसांचा डाव

संभाजीराजेंनी लढण्याआधीच तलवार म्यान केल्याने विविध नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रया येत आहेत. अशातच संभाजीराजेंच्या माघाराविषयी त्यांचे वडील शाहू छत्रपती यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजेंच्या माघारीला फडणवीसांना जबाबदार धरलं आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी होती, असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला आहे. कोल्हापुरातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.बहुजन मतांच्या विभाजनसाठी भाजपची खेळी

संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्याचं विविध विषयांवर बोलणं झालं. संभाजीराजेंना अपक्ष लढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने भाग पाडलं. बहुजन मतांचं विभाजन व्हावं, यासाठी भाजपने ही खेळी खेळली, असा आरोपही शाहू छत्रपती यांनी केला.

…तर तो छत्रपती घराण्याचा अपमान नाही!

संभाजीराजेंना उमेदवारी न देऊन शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, अशी टीका विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या टीकेलाही छत्रपती शाहूंनी उत्तर दिली. “संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान केला असं होत नाही. संभाजीराजेंची ती राजकीय भूमिका होती”, असं शाहू छत्रपती म्हणाले.

error: Content is protected !!