आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमाप्रमाणे राबवा,राष्ट्रवादीचे कृष्णा कटारे यांचा आंदोलनाचा इशारा

0 33

परभणी,दि 29 ः
परभणी जिल्ह्यामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया नियमाप्रमाणे राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे करण्यात आली याबाबत सोमवार दिनांक 29 जुलै रोजी दुपारी दोन वाजता निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश संघटक कृष्णा कटारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान नियमाप्रमाणे शंभर विद्यार्थी संख्येमागे 25 विद्यार्थ्यांची निवड अपेक्षित होत असताना केवळ दहा ते बारा लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, नियमाप्रमाणे 25 टक्केची  ची अट पूर्ण करण्यात आली नाही, शासन दरबारी अनेक शाळेची एकाच तुकडीची अंदाजे चाळीस विद्यार्थ्यांची नोंद आहे, परंतु प्रत्यक्षात त्या शाळेत तीन-तीन तुकड्या व अंदाजे 100 च्या वर विद्यार्थी संख्या आहे. आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची निवड व्हावी म्हणून चुकीच्या पद्धतीने भाडेकरारनामा करत एक किलोमीटरच्या आत चुकेची लोकेशन दाखवत रहिवाशी दाखवले आहे. त्यामुळे नियमाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या आणि गरजवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे या सर्व बाबत चौकशी करुन योग्य प्रकारे निवड करावी  अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी प्रदेश संघटक कृष्णा कटारे यांच्या नेतृवाखाली निवेदन देण्यात आले.

error: Content is protected !!