डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
हिंगणघाट,दि 15 (प्रतिनिधी):
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आर्थिक ,सामाजिक ,राजकीय दिशा देण्याचे कार्य केले.जल प्रकल्प,विद्युत प्रकल्प असो की , सद्या अस्तित्वात असलेले संतती नियमनाचा कायदा,कमालजमीन धारणेचा कायदा,किमान वेतनाचा कायदा इत्यादी कायदे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतूनच साकारलेले आहे.वित्त आयोग,निती आयोग,सेवायोजन कार्यालये ,रिझर्व्ह बँकेची स्थापना इत्यादींच्या निर्मितीतही आंबेडकरांचा फार मोठा वाटा आहे असे प्रतीपादन अनिल जवादे यांनी केले.ते डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहात अध्यक्षिय भाषणातून बोलत होते.तत्पूर्वी आंबेडकरांचे सामाजिक योगदान या विषयावर चंद्रकांत नगराळे यांनी, डॉ.बाबासाहेबांचा विज्ञानवादी विचार या विषयावर प्रा.जी.यु.शिंगणे यांनी ,बाबासाहेबांचा आर्थिक विचार या विषयावर प्रा.दिलीप पाटील यांनी आणि प्राचार्य एस.एम.राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांची कौटुंबिक आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकला. या प्रसंगी विचार मंचावर संस्थेचे संचालक बी.एस.पाटील उपप्राचार्य गुडदे,उपमुख्याध्यापीका सुनीता बनसोड ,प्रायमरीचे मुख्याध्यापक दिलीप देवतळे ,वसंत चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य रुईकर ,पर्यवेक्षक दिनेश वाघ,शिरपूरकर सर,सुनीता खैरकार याःची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना करीता जयंती निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख,पी.डी.भगत,प्रा.प्रफुल लोहकरे,प्रा.प्रशांत भटकर, रवि मसराम,गजानन भोंग,एस.के.महाजन,राहुल चंदनखेडे ,अर्चना अवचट,धोटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा दारूनकर यांनी तर आभारप्रदर्शन अपर्णा पाटील यांनी केले.