सेलूत कापसाला मिळाला विक्रमी ११३५५/- रुपये प्रति क्विंटल भाव
सेलू, प्रतिनिधी – आज दि २१/३/२२ रोजी सेलूच्या कापूस यार्डात झालेल्या कापूस लिलावात पाटोदा येथील कृष्णा येवले या शेतकऱ्याच्या कापसाला ११३५५/-क्विंटल दर मिळाला असून यावेळी त्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. किमान दर ८४००/-तर सर्वसाधारण दर ११२००/- देण्यात आला आहे.
या लिलावात कापूस खरेदीदार रामेश्वर राठी,गोपाल काबरा, आशिष बिनायके ,निर्मल भाई,प्रसाद फायबर,ग्लोबल कॉटन आदींनी कापूस खरेदी केला .यावेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, सचिव राजीव वाघ ,अशोक वाटोडे,बद्रीनाथ ताठे,सुरेश गायकवाड,हिंगे,सरदेश खंडागळे,विष्णू मोरे,कैलास गलांडे आदींची उपस्थिती होती.
आपल्या कापसाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ करून कचरा विरहित आणावा व सोबत बँक पासबुक व आधार कार्ड ची झेरॉक्स आणावी असे आवाहन रणजित गजमल यांनी केले आहे.