भागवत कथेत घेतला महिलांनी कृष्ण जन्माचा मनमुराद आनंद

2 100

 

सेलू, प्रतिनिधी – येथील फोफसे गल्लीतील भागवत कथेत उपस्थित महिलांनी कृष्ण जन्माचा मनमुराद आनंद घेतला. टिपऱ्या ,फुगडी खेळत व घेर धरून यावेळी महिलांनी ” किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला ” या गीतावर सुंदर नृत्य सादर केले.

 

येथील प्रसिद्ध विधिज्ञ ऍड अशोकराव फोफसे यांनी या भागवत कथेचे आयोजन केले आहे .नागपूर येथील भागवताचार्य विलास महाराज खिल्लारे यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीतून या भागवत कथेचे निरूपण केले जात आहे.

 

 

यावेळी भागवताचार्य हरी महाराज दांगट तसेच रमेश बिटे व विष्णू घोळमे हे संगीत साथ देत आहेत.

 

भागवत कथेचा आज चौथा दिवस होता. यामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णाचा सुंदर पाळणा सजविण्यात आला होता .तसेच कृष्णाचा सजीव देखावा देखील करण्यात आला होता .जन्म होताच वसुदेव टोपलीत घेऊन कृष्णाला घेऊन मंडपात येताच सर्वांनी जयजयकार करीत स्वागत केले. दरम्यान दुपारी भक्त प्रल्हादाच्या हाके वरून दिती पुत्र हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी घेण्यात आलेल्या विष्णूच्या नरसिंह अवताराची कथा देखील विस्तृत रुपात सांगण्यात आली .उद्या इतर कथांबरोबरच कृष्णाच्या बाल क्रीडा ,गोपीनृत्य ,कृष्ण विवाह व गोवर्धन पूजा होणार आहे.

 

साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सपत्नीक भागवत ग्रँथाची आरती करण्यात आली.

error: Content is protected !!